mamata banerjee and owaisi

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार रॅली दरम्यान भाजपावर निशाणा साधत म्हटले की, भाजपा असदुद्दीन ओवेसींच्या(asaduddin owaisi) एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे प्रयत्न करत आहे. त्यावर आता ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालमच्या विधानसभा निवडणुकांअगोदर राजकीय वातावारण तापलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. राज्यभर प्रचार सुरु आहे. ममता बॅनर्जीसुद्धा भाजपासह विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार रॅली दरम्यान भाजपावर निशाणा साधत म्हटले की, भाजपा असदुद्दीन ओवेसींच्या(asaduddin owaisi) एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे प्रयत्न करत आहे.

ममता बॅनर्जींच्या विधानावर ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजपर्यंत असा कुणी जन्माला आलेला नाही की जो पैशांनी ओवेसीला विकत घेऊ शकेल. त्यांचे आरोप निराधार आहेत व त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी आपल्या घराची(पक्ष)ची काळजी करायला हवी, कारण त्यांच्या पक्षातले अनेकजण भाजपामध्ये जात आहेत. त्यांनी बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा अपमान केला आहे.”असे ओवेसींनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी ?
ममता बॅनर्जी यांनी आपल्या जलपाईगुडी येथील सभेत म्हटले होते की,  “अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी त्यांनी (भाजपा) हैदराबादची एक पार्टी(एमआयएम)ला पकडले आहे. भाजपा त्यांना पैसे देते व ते मतांचे विभाजन करण्याचं काम करतात. बिहार निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे.”