परळीतील आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची सभा संपन्न

वाडा: वाडा तालुक्यातील परळीमध्ये आज स्वातंत्र्य दिनानिमित्त रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची सभा अध्यक्षा रोहिणी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली, सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र परळी येथे आयोजित केली गेली होती.

या सभेमध्ये विविध आरोग्य विषयक समस्यांवर चर्चा करण्यात आली, तसेच कोविड-१९ च्या काळात केलेल्या कार्याबद्दल सर्व डॉक्टर, नर्स, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आरोग्य विषयक ज्या काही समस्या असतील त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडविल्या जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या तसेच रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा रोहिणी शेलार यांनी दिली.

या  सभेमध्ये पालघर जिल्हा परिषद सदस्या रोहिणी शेलार, पंचायत समिती सदस्या पूनम पथवा,पंचायत समिती सदस्य रघुनाथ माळी,पंचायत समिती सदस्य सागर ठाकरे, ग्रामपंचायत परळी सरपंच संजय वागळे, सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तारक जाधव, स्वीकृत सदस्य सदानंद थोरात, स्वीकृत सदस्य सुमित जाधव एकलव्य स्वावलंबन संस्था सदस्य अमित पाटील  ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बुरपल्ले, गट शिक्षणाधिकारी जयवंत खोत, प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीश पाटील व इतर सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.