पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील रस्ते रुंदीकरणाला मंजूरी

पनवेल : पनवेल(panvel) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत(general meeting) शहरातील रस्ते(roads) रुंदीकरणाला महासभेने मंजूरी दिल्याने लवकरच शहरातील महत्वाचे रस्ते मोकळा श्वास घेतांना दिसतीलच तसेच या भागात स्वच्छताही दिसणार आहे. .कोव्हिड -१९ मुळे आजची महासभा ही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या सभेला सभागृहात नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. पनवेल महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे महासभा घेण्यात आली आहे.
पनवेल महापालिकची सर्वसाधारण महासभा सोमवारी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या सभेला सभागृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल , उपमहापौर जगदीश गायकवाड , आयुक्त सुधाकर देशमुख , उपायुक्त शिंदे, सभागृह नेते परेश ठाकूर , विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिति अध्यक्ष प्रवीण पाटील , महिला व बाल कल्याण सभापती कुसुम म्हात्रे , प्रभाग समिति सभापति शत्रुघ्न काकडे , संजय भोपी, तेजस कांडपिळे उपस्थित होते .
आजच्या सभेत १८ फेब्रुवारीच्या सभेत स्थगित ठेवलेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील मंजूर विकास योजनेतील रमागणेश गडकरी मार्ग , कापड बाजार मार्ग , महात्मा फुले मार्ग आणि लोकमान्य टिळक मार्ग ९.१५ मीटर रुंदी करणाच्या भूसंपादनाच्या खर्चाला मंजूरी देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात येऊन त्याला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी भविष्यात कमी होणार आहे.याशिवाय या भागात स्वच्छता वाहनांना जाण्यासाठी होणारी अडचण कमी झाल्याने या भागाची स्वच्छता करणे सोयीचे होणार आहे. याशिवाय पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध १२ ठिकाणी शौचालय चालवण्या करिता संस्थेची नेमणूक करण्यास परवानगी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका महापौर सहाय्यता निधी पनवेल जिल्हा – रायगड या नावाचा ज्ञास स्थापन करून त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली. सभागृ नेत्यांचे २ महिन्याचे व विरोधीपाक्ष नेत्यांचे १ महिन्याचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्यास मान्यता देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्यासाठी निवास्थान बांधणे , खारघर नोड  ‘नो हॉकिंग झोन ’ करणेबाबत आणि पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतनाचे सापेक्ष ठोक मानधन आणि महापालिका कर्मचार्‍यांना कोव्हिड भत्ता प्रतीदिन ३०० रुपये देण्याचा निर्णय पुढील सभेत चर्चा करून घेण्याचे ठरले.
आजच्या सभेची सुरुवात कोव्हिड -१९ या विषयावर चर्चा झाली. अनेक नगरसेवकांनी आपल्याला आलेले अनुभव सांगून खाजगी रुग्णालये आणि तेथील व्यवस्थेवर टीका केली. त्याठिकाणी कशा प्रकारे रुग्णांना लुटले जात आहे याचे वर्णन माजी उप महापौर विक्रांत पाटील पाटील , प्रकाश बिनेदार प्रभाग समिति अध्यक्ष तेजस कांडपिळे आदी सदस्यांनी केले. सभागृह नेते परेश ठाकुर यांनी बंकेट हॉल येथे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार होते त्याचे काय झाले ? सुरू झाले असल्यास माहिती का दिली नाही असा प्रश्न उपस्थित केला. याशिवाय प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये फलक लावून त्यावर चुकीचे बिल दिल्यास कोणाशी संपर्क साधावा त्याचा मोबाईल नंबर देण्यात यावा, अशी मागणी केली. आयुक्तांनी हे हॉस्पिटल सुरू झाले असून माहिती न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येक रुग्णालयातील संपर्क अधिकार्‍याचे मोबाईल नंबर सगळ्यांना देण्यात येतील,असे सांगितले. यावेळी त्यांनी खाजगी रुग्णालयांवर कारवाई केल्यावर ते उच्च न्यायालयात दावा दाखल करीत असल्याची माहिती दिली. सुयस्थ रुग्णालयाने ७ कोटीचा दावा केल्याचे सांगितले .
पनवेल महापालिकेचे सर्व साधारण सभा पहिल्यांदाच ऑनलाईन घेण्यात आली. ती अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे झाली. अनेक नगरसेवक त्यामध्ये सहभागी झाले. सभा समाधानकारक झाली पण काही वेळा नेटच्या प्रॉब्लेममुळे आवाज येत नव्हता. त्यामुळे पुढील सभा ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. – डॉक्टर कविता चौतमोल , महापौर