pravin darekar

मराठा आरक्षणासंदर्भात(maratha reservation) सरकार (state government)चुकीची भूमिका मांडत असून हे प्रकरण ताटकळत ठेवले जात आहे. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये(supreme court) चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद केला जात आहे. सरकार या प्रकरणाला अजिबात गांभीर्याने घेत नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

    मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)मराठा आरक्षणावर(maratha reservation) स्थगिती आणल्यामुळे मराठा समाजाता कमालीचा असंतोष पसरला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार चुकीची भूमिका मांडत असून हे प्रकरण ताटकळत ठेवले जात आहे. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद केला जात आहे. सरकार या प्रकरणाला अजिबात गांभीर्याने घेत नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

    चव्हाणांची भूमिकाच चुकीची
    मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणासंदर्भात माध्यमांमध्ये चुकीचे भूमिका मांडत आहेत. या सरकारची मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मानसिकताच दिसून येत नाही. कारण गेल्या सरकारमध्ये आम्ही सत्तेत असताना योग्य पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु ते पुढे टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. या सरकारने त्यासंदर्भात उदासीनता दाखवलेली आहे. तसेच सुप्रीम कोर्टामध्ये योग्य प्रकारे युक्तिवाद करण्यात आला नाही. त्यामुळेच हे आरक्षण सध्या रखडलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, अशी खंत दरेकर यांनी बोलून दाखविली.

    शिवसेना वाझेंची पाठराखण का करत आहेत?
    सचिन वाझे यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी सज्ज स्कॉर्पिओ आणि मनसूख हिरेन मृत्यू या प्रकरणाचा सचिन वाझे यांनीच संपूर्ण कट रचला आहे. या संदर्भातील सगळे पुरावे आता समोर आलेले आहेत. मात्र, असे असतानादेखील शिवसेना वाझेंना पाठीशी का घालत आहे? ही पाठराखण का केली जात आहे? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे वाझेंची पाठराखण करण्यासाठी का आग्रही आहेत? हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. वाझे यांच्या पाठी जे कोणी राजकीय नेते आहेत, ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची नावे लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे. एनआयए त्यांच्यावरती देखील योग्य पद्धतीने कारवाई करेल, अशी आम्हाला आशा आहे, असे दरेकर म्हणाले.