पालघरमध्ये विविध ठिकाणी राज्य सरकारविरोधात निदर्शने

पालघर : पालघर जिल्ह्यात भाजपच्या बारा मंडलांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक वर्गाला दिलासा द्यावा, गायीच्या दुधाला ३० रुपये लिटर भाव द्यावा आणि सरकारने प्रतिलीटर १० रुपये अनुदान द्यावं, दुधाच्या भुकटीच्या निर्यातीवर प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावं, तसेच काही स्थानिक मुद्दे घेऊन पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, तलासरी, मनोर, विक्रमगड, जव्हार, पालघर, वाडा ( कुडूस), मोखाडा, डहाणू, पाचमाड(पालघर), बोर्डी,  धुंदलवाडी(डहाणू) आदी ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन , निदर्शने करून आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आले.