पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

नवल किशोर यांनी प्रत्येक वेळी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातही त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून घेतलेले निर्णय, केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,असे समजते.

मुंबई: पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश केंद्र सरकारने आज काढल्याची माहिती मिळाली आहे. नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मुळचे बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील आहेत.

नवल किशोर राम यांनी २०१८ साली पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.त्याआधी ते औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. तसेच त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ आणि बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहीले आहे. नुकतेच देशभरातील लोकप्रिय जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात नवल किशोर राम यांना पन्नास लोकप्रिय जिल्हाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळाले होते.

नवल किशोर यांनी प्रत्येक पदावर आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातही त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून घेतलेले निर्णय, केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,असे समजते.