अमित ठाकरे असतील मनसेच्या विद्यार्थी सेनेचे नवे अध्यक्ष?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या अमित ठाकरे यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून मनसेत सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडं सध्या मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी आहे. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न ते पक्षाच्या माध्यमातून मांडत असतात. करोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडं सरकारचं पत्राद्वारे लक्ष वेधलं होतं. नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड आकर्षण आहे.

  मनसेच्या आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे येणार असल्याचं बोललं आहे. त्यामुळे असं झाल्यास भविष्यात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी शिवसेना व मनसेमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

  मिळालेल्या अधिक माहितीनुसार आदित्य शिरोडकर यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे.

  राज ठाकरे पत्रकार परिषदेत जाहिर करणार?

  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला रवाना झाले आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणार आहेत. कदाचित राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर करण्याची शक्यता आहे.

  हे सुध्दा वाचा 

  Naked City : इथं कपडे घातल्यावर ठोठावला जातो दंड ; अगदी बँकेतही लोक नग्नच जातात

  कोण आहेत अमित ठाकरे

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या अमित ठाकरे यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून मनसेत सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडं सध्या मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी आहे. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न ते पक्षाच्या माध्यमातून मांडत असतात.

  करोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डॉक्टर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडं सरकारचं पत्राद्वारे लक्ष वेधलं होतं. नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड आकर्षण आहे.

  हे सुध्दा वाचा

  “काय माहित रात्री कुणाला अटक झाली तर..” भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य