rajnikant and kamal hasan

अभिनेत्यावरून नेते बनलेल्या कमल हसन(kamal hasan) यांनी सुपरस्टार रजनीकांतसोबत (rajnikant)काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दिल्ली: अभिनेत्यावरून नेते बनलेल्या कमल हसन(kamal hasan) यांनी आपला सहकारी सुपरस्टार रजनीकांतसोबत (rajnikant)काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपली विचारधारा एकच असेल आणि याचा जनतेला फायदा होत असेल तर अहंकार सोडून आपण एकमेकांना सहकार्य करण्यास तयार असले पाहिजे, असे कमल हसन म्हणाले. रजनीकांत यांचा पक्ष अखिल भारतीय मक्कल सेवा कच्चीशी (ऑल इंडिया पीपल्स सर्व्हिस पार्टी) युती करण्याबाबत कमल हसन यांनी सकारात्मक संकेतही दिले.

चर्चेअंती घेणार निर्णय
आम्ही आता फक्त एका फोन कॉलपासून दूर आहोत. युतीबाबतचा निर्णय रजनीकांत यांनी घ्यायचा आहे. रजनीकांत यांनी संपर्क केल्यास आम्ही एकत्र बसून यावर पुढील चर्चा करू, असं कमल हासन म्हणाले. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती करायची की नाही? याचा निर्णय पक्षाने माझ्यावर सोपवला आहे. लवकरच त्याच्यांसोबत युतीची घोषणा करेन परंतु आताच काही सांगू शकणार नाही, असेही कमल हसन यांनी स्पष्ट केले.

प्रचारास प्रारंभ
पुढच्या वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी हसन यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात १३ डिसेंबरपासून केली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मदुराई, थेनी, दिंडुगुल, विरुधुनगर, तिरुनेलवेली, तूतीकोरिन आणि कन्याकुमारी या जिल्ह्यांचा दौरा कमल हसन करणार आहेत. रजनीकांत यांनीही स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्या पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह समोर आलं आहे. रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव अखिल भारतीय मक्कल सेवा कच्छी (अखिल भारतीय पीपल्स सर्व्हिस पार्टी) असे असून पक्षाचे चिन्ह ‘रिक्षा’ असे आहे.