rajnikant

अभिनेते रजनीकांत(rajnikanth) लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला(rajnikanth in politics) सुरुवात करत नव्या पक्षाची घोषणा करतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. अशातच रजनीकांतने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. 

अभिनेते रजनीकांत(rajnikanth) लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला(rajnikanth in politics) सुरुवात करत नव्या पक्षाची घोषणा करतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. अशातच रजनीकांतने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.  रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही माहिती दिली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफीदेखील मागितली आहे.

बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता असं म्हणतं रजनीकांत यांनी राजकीय कारकिर्दीत थोडी विश्रांती घेतली आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये असं सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे.

रजनीकांत यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे. रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती.

रजनीकांत यांना नुकतंच प्रकृती बिघडल्याने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. २७ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.