रणधीर शिंदे यांची स्वराज्य शिक्षक संघ ठाणे जिल्हाध्यक्षपदी वर्णी

मोहने येथील जेष्ठ शिक्षक रणधीर शिंदे यांची स्वराज्य शिक्षक संघ ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

कल्याण :- मोहने येथील जेष्ठ शिक्षक रणधीर शिंदे यांची स्वराज्य शिक्षक संघ ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून शिंदे हे शालेय संस्थेत कार्यरत असून त्यांच्या नियुक्तीने ठाणे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होत आहे. ठाणे जिल्ह्यातील आश्रम शाळा येथे कार्यरत असणारे रणधिर शिंदे सर्वांना परिचित असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गासाठी सतत ते शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

याच कार्याची दखल घेत स्वराज्य शिक्षण संघटनेने शिंदे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याचे संघटनेचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंग पवार यांनी जाहीर केले. पालघर जिल्ह्यातही संघटना वाढविण्यासाठी शिंदे प्रयत्न करतील असा आशावाद संघटनेने व्यक्त केला आहे. शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी आनंद व्यक्त करीत आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.