चीनला जशास तसे प्रत्युत्तर द्या – जितेंद्र आव्हाड

मुंबई - लडाखच्या गलवान खोऱ्यात १६ जून २०२० रोजी चीनी सैन्याने घुसखोरी केली. घुसखोरी दरम्यान भारताने प्रत्त्युत्तर दिले. भारतीय जवानांनी चीनच्या ४३ जवानाना ठार केले तर भारताचे २० जवान शहीद झाले.

 मुंबई – लडाखच्या गलवान खोऱ्यात १६ जून २०२० रोजी चीनी सैन्याने घुसखोरी केली. घुसखोरी दरम्यान भारताने प्रत्त्युत्तर दिले. भारतीय जवानांनी चीनच्या ४३ जवानाना ठार केले तर भारताचे २० जवान शहीद झाले. याच पार्श्वभूमीवर भारत-चीन या दोन्ही देशांत तणावाचे वातावरण पसरले आहे. चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे भारत देश हळहळ व्यक्त करत आहेत. याचाच धागा घेवून सर्व पक्षांनी नरेंद्र मोदींना धारेवर धरले आहे. नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सरळ नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की… चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता? आशा आशयाचे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.