election

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या पाच जागांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका पोटनिवडणुकीचा कौल आता स्पष्ट झाला आहे. आगामी विधानसभेसाठी ट्रेलर ठरलेल्या या निवडणूक निकालाने महाविकास आघाडीचे बळ वाढवले आहे तर एकला चलो रे ची भमिका घेणाऱ्या भाजपला विचार करायला लावणारा ठरला आहे.

– राजा आदाटे

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या पाच जागांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका पोटनिवडणुकीचा(election in maharashtra) कौल आता स्पष्ट झाला आहे. आगामी विधानसभेसाठी ट्रेलर ठरलेल्या या निवडणूक निकालाने महाविकास आघाडीचे बळ वाढवले आहे तर एकला चलो रे ची भमिका घेणाऱ्या भाजपला विचार करायला लावणारा ठरला आहे. पाचही जागी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्पष्ट बहुमताची आघाडी घेत विजय मिळवला आहे. धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या १३ महिन्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या अंबरीश पटेल यांनी सरशी मारली असली तरी तो त्यांचा व्यक्तीगत विजय असल्याचेच मत राजकीय स्तरावर मानले जाता आहे.

एकोप्याचे दर्शन देणारा पुणे पदवीधरचा अरुण लाड यांचा विजय

पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकोप्याचे दर्शन घडवणआरा मानला जातो. उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करत ४८ हजार ८२४ हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रचारात उतरल्याने यंदा पुण्याची लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. दोन पाटलांमधील हा सामना आहे असेच मानले जात होते. अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासूनच आघाडीवर होते. त्यांच् विजय टप्प्यात येताच अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली आणि दुसर्‍या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित मानला गेला.

मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये सतीश चव्हाण यांची बोराळकरांवर मात केली आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव केला आहे.

सतीश चव्हाण यांनी सलग तिसर्‍यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला. सतीश चव्हाण यांना १लाख १८ हजार ६३८ मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. एकूण वैध मते २ लाख १८ हजार ८१६ तर २३०९२ मते बाद ठरली. सतीश चव्हाण यांनी विजयाची आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रितपणे त्यांचे अभिनंदन केलं.

फडणवीसांच्या बालेकिल्ल्याला अभिजीत वंजारींचा सुरूंग

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघात तर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीने भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला ही बाब भाजपला धक्का देणारी आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. भाजपचे मुख्यालय असलेल्या नागपुरात उमेदवार पराभूत झाल्याने भाजपला हादरा बसला आहे. १९५८ नंतर पहिल्यांदाच भाजप गड ढासळला. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. १९५८पासूनच हा मतचदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. १९५८पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. केंद्र आणि राज्यात कुठेही पक्षाची सत्ता नव्हती तेव्हाही पक्षाचे उमेदवार येथून विजयी झाले होते. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासुन हा गड भाजपच्या ताब्यात होता. १९५८ मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते बिनविरोध निवडूण आले. प्रा. अनिल सोले यांनी पदवीधर मतदार संघात विजयाची पताका कायम राखली. हे संघाचे मुख्यालय आहे. येथे पराभव होणे हा घरात येवून शत्रूने सुरूंग लावल्या सारखे झाले आहे. हा पराभव भाजपला नक्कीच सलत राहील.

अमरिश पटेल यांची स्वबळावर विजयाची हॅटट्रिक

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. १२ महिन्यांचा कालावधी बाकी असताना स्वत: अमरिश पटेल यांनी राजीनामा देवूबन का’ग्रेस पक्षातून भाजमध्ये उडी मारली होती. त्यांचाच हा गड त्यामुळे अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांना ३३२तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना ९८मते मिळाली. अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००९, २०१५ आणि आता २०२० मध्ये विजय मिळवला. या मतदारसंघात अमरिश पटेल यांनी भाजपची मतं तर मिळवलीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल ११५ मते फुटली असल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. जर आकड्यातच बोलायचे झाले तर भाजपाचे १९९ तर महाविकास आघाडीचे २१३ इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या ११५ मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला आणि भाजपाचे अमरिश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.

अमरिश पटेल यांनी ३० सप्टेंबर २०१९ रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. जर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ १४ डिसेंबर २०२१ पर्यंत होता. पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च २०२० मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर २०२० मध्ये पार पडली आणि केवळ १२ महिन्यांसाठी निवडणूक लागली. या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो केवळ १२ महिन्यांसाठीच आमदार होईल हे निश्चित होते. मात्र अमरिश पटेल यांनी पुन्हा दावेदारी दाखल करुन उरलेल्या १२ महिन्यांसाठीही आपणच आमदार असू, हे सिद्ध केले. मात्र राज्यातील इतर पाच जागांचे निकाल पाहीले तर त्यांचा खरा कस लागणार आहे तो १२ महिन्यानंतर पुन्हा नवडणूक लागेल तेव्हा. जर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी इथेही प्रतिष्ठा पणाला लावली तर मात्र पटेल यांना जड जाणार आहे.

धुळे, नंदुरबार निर्णय हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता.त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. गेले वर्षभर आम्ही काम करून दाखवले आहे. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती, असे मत खुद्द शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तर “देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवली तरी महाविकास आघाडीतर्फे त्यांचा नक्कीच पराभव होईल,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी विरोधीपक्षनेते पडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यातूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा वाढलेला आत्मविश्वास लक्षात येतो. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावर व्यक्त केला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे.

काँग्रेस नेत्यांना एकत्र करणारी निवडणूक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विदर्भातील सर्व काँग्रेस नेत्यांना एकत्र करून जबाबदारी दिली. ऊर्जामंत्री नितीन राऊत, नागपूर शहर नागपूर ग्रामीण आणि वर्ध्याची जबाबदारी घेतली, सुनील केदार यांनी. तर चंद्रपूर सांभाळले ते विजय वडेट्टीवार यांनी. त्यांना साथ मिळाली राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल, खासदार बाळू धानोरकर यांची. पुण्यासाठी देखील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन इतिहास रचला. संपर्कमंत्री असलेल्या पुण्यात देखील बाळासाहेब थोरांताच्या नेतृत्वात संपर्कमंत्री असलेल्या विश्वजित कदम तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपली जबाबदारी पार पाडत विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला. विश्वजित कदम यांच्यावर विशेष जबाबदारी होती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात प्रचार आणि मतदानाची जबाबदारी बजावली आणि इतिहास घडला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर भाजपला पहिला तडाखा दिला तो नागपूर पदवीधरमध्ये. विदर्भात नेहमी भाजप विरुद्ध काँग्रेस लढाई होते. गेल्या काही वर्षात विदर्भात काँग्रेसचे नुकसान झाले. पण नागपूर पदवीधर निवडणुकीने किमान काँग्रेसला संजीवनी मिळाली. पक्ष एकत्र येऊन काम केले तर काय करू शकतो हेच यातून दिसले. नागपूर जिल्हापरिषद आणि पाठोपाठ पदवीधर निवडणुकीत भाजपला धूळ चारत काँग्रेसने दाखवली एकीची ताकद दाखवली. राज्यात काँग्रेस आज चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पुणे शिक्षक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर म्हणजे विदर्भात विधान परिषदेत काँग्रेसला यश मिळाल्याने संघटनेला नक्कीच इथे बळ मिळेल. यापासून धडा घेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रीत काम केले तर काय होईल याचा अंदाज देणारी ही निवडणूक काँग्रेससाठी म्हणावी लागेल.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे या पहिल्या परिक्षेत पास झाले आहेत. शेवटी काही बरेवाईट निकाल आले असते तर मुख्यमंत्री म्हणून या निवडणुकीचे अंतिम खापर त्यांच्यावर फुटले असते. शिवसैनिकांना आणि सेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना त्यांनी दिलेल्या सुचनांचे चोखपणे पालन झाल्याचे निकालात दिसले आहे.