बीड जिल्ह्यातील बौद्ध कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा रिपाइंने केला निषेध

कल्याण : बीड(beed) जिल्ह्यातील वडवणी येथील भीमनगरातील सोनाजी उजगरे या बौद्ध कुटुंबियांवर काही गावगुंडांनी भ्याड हल्ला केला आहे. कल्याणमध्ये(kalyan) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(republican party of India) आठवले गटाच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रिपाइंचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केला. यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे वडवणी येथील बौद्ध कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई करण्याची तसेच सोनाजी उजगरे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून ती देखील ताबडतोब मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.