कोरोनाचा प्रभाव वाढताना सुरक्षिततेचे नियम धाब्यावर

वाडा: पालघर जिल्ह्यात कोरोना(corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच मृत्यूदर(death rate) ग्रामीण भागात वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आजपर्यंत १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाडा तालुक्यात ५६ हॉटस्पॉट(hotspot) असलेल्या ठिकाणाहून रूग्ण रूग्ण आढळत आहेत.
या भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन होत नाही .इथल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दुकानदार सामजिक अंतर पाळत नाहीत. सॅनिटायझरचा वापर होत नाही. ग्राहकाने सूचना केली असेल तर तो सांगेल तेव्हा सॅनिटायझर दिले जाते. मास्कही लावले जात नाहीत. असा कारभार कोराना पार्श्वभूमीवर सध्या सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भीती वाटत आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीदरम्यानही तोच प्रकार येथे दिसून येत आहे.  वाहतुकीदरम्यान कोरोनापासून बचावासाठी  कोणतेही नियम पाळले जात नाहीत.