समाजवादी पार्टी साधणार लहान पक्षांसोबत संधान, अखिलेश यादव यांची घोषणा

समाजवादी पक्षाचे(samajwadi party) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव(akhilesh yadav) यांनी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष लहान पक्षांसोबत युती(alliance with small parties) करणार असल्याची घोषणा केली.

लखनौ : समाजवादी पक्षाचे(samajwadi party) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव(akhilesh yadav) यांनी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष लहान पक्षांसोबत युती(alliance with small parties) करणार असल्याची घोषणा केली. अखिलेश यादव यांनी ही घोषणा करतेवेळी बसपा आणि काँग्रेसचा नामोल्लेख न करता निशाणाही साधला. मोठ्या पक्षांसोबत आजवर करण्यात आलेली युती यशस्वी ठरली नाही, असे ते म्हणाले. उल्लेखनीय असे की यापूर्वी सपाने बसपा आणि काँग्रेससोबत युती केली होती आणि दोन्हीवेळेस समाजवादी पक्षावर पराभवाची नामुष्की ओढवली होती.

प्रत्येकवेळी ओढवली नामुष्की
उत्तर प्रदेश पोटनिवडणूक आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी सपाने बसपासोबत युती केली होती. या निडवणुकीत सपाला पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यावेळी सपाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले होते याउलट बसपाला मात्र या युतीचा फायदा होता. बीएसपीच्या खात्यात १० जागा गेल्या तेथेच कुटुंबातीलच तीन मतदारसंघ कन्नौज, फिरोजाबाद आणि बदायूही सपाच्या हातातून निसटले होते.

समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांनी बसपासोबतच्या युतीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी मायावतींना केवळ ३८ जागाच देण्याचे सुचविले होते. त्यावेळी त्यांनी अर्ध्या जागांवर निवडणुकीपूर्वीच पराभव झाला असे विधान केले होते.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत युती केली होती आणि याही निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यावेळी काँग्रेसने १०५तर समाजवादी पक्षाने २९८ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र निकालात युतीला केवळ ५२ जागा मिळाल्या