अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात सामंतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: अंतिम वर्षाच्या(last year) परीक्षेसंदर्भात आज सकाळी ११ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत(uday samant) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(governor bhagatsingh koshyari) यांची राजभवनावर(raj bhavan) भेट घेतली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा उपस्थित होते. उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापींठाचे कुलगुरूंची बैठक(vice chancellor meeting) होणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही,अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांना दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरूंचे म्हणणे जाणून घ्यावे. समितीचा अहवाल आल्या नंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आशा सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या.

सामंत म्हणाले, उद्या दुपारी ४:०० वाजता राज्यपालांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल आणि त्यानंतर समितीचा अहवाल सादर केला जाईल.