saryu rai

कायदे, नियम धाब्यावर बसवून शाह ब्रदर्सला पोलाद देण्याच्या खाण सचिवांच्या आदेशावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामागे मोठा घोटाळा झाला असल्याची चर्चाही सुरू आहे. माजी मंत्री आणि अपक्ष आमदार सरयू राय यांनी जे आरोप केले त्याची चौकशी केली तर जवळपास ४०० कोटींचा घोटाळा(400 crore scam) झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

राची: कायदे, नियम धाब्यावर बसवून शाह ब्रदर्सला पोलाद देण्याच्या खाण सचिवांच्या आदेशावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामागे मोठा घोटाळा झाला असल्याची चर्चाही सुरू आहे. माजी मंत्री आणि अपक्ष आमदार सरयू राय यांनी जे आरोप केले त्याची चौकशी केली तर जवळपास ४०० कोटींचा घोटाळा(400 crore scam) झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

माजी मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, युतीतील सहकारी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनीही यात मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. यासोबतच त्यांनी शाह ब्रदर्सकडून वसुलीची मागणीही केली आहे. तथापि सरकारने मात्र या मुद्यावर मौन साधले आहे आणि खाण विभागाचे अधिकारी यावर तोंड उघडायलाही तयार नाही.

उत्खनन ठप्प, किमतीत वाढ
कोरोना संकटातून बाहेर येताच व्यापारातील ज्या क्षेत्रांनी जोर धरला आहे त्यात पोलादक्षेत्र आघाडीवर आहे. यामागचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरापासून झारखंड आणि ओडिशातील खाणी व तेथील उत्खनन ठप्प आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणीत तफावत निर्माण झाली व किमतीतही वाढ झाली. जागदिक बाजारातही पोलादच्या किमतीत ७ ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मर्यादित साठ्यापेक्षा अधिकच्या विक्रीस परवानगी

सरयू राय यांनी केलेल्या आरोपानुसार शाह ब्रदर्सला दिलेली लीज २०१९ मध्ये रद्द झाली होती. त्यामुळे साठा केलेल्या पोलादावर त्यांचा अधिकार नव्हता. जो साठा होता, ती राज्य सरकारची मालमत्ता होती. सप्टेंबरमध्ये शाह ब्रदर्सने दिलेल्या दाखल्यानुसार त्यांच्याकडे ३.६० लाख टन साठा शिल्लक होता जेव्हाकि त्यांना परवानगीअंती ५.७० लाख टन पोलाद विक्रीची मुभा देण्यात आली होती. यावरूनच हा घोटाळा कशा पद्धतीने झाला याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे साठा केलेल्या पोलादची पूर्णत: विक्री झाल्यानंह या घोटाळ्याचा खुलासा झाला आहे. सरयू राय यांनी उपरोक्त ठिकाणी फारच थोड्या प्रमाणात साठा असल्याचाही खुलासा केला.

असे आहे समीकरण
सद्यस्थितीत बाजारात साडेसात हजार ते आठ हजार रुपये प्रति टन कोळसा विक्रीचे दर आहेत. जर पाच लाख टन कोळसा गायब झाला तर त्याची किंमत (५,००,०००x८००० रु. प्रति टन) जवळपास ४०० कोटी होते.