पाहा पालघर हत्याकांडाबाबत काय म्हणाले गृहमंत्री…

मुंबई : पालघर जिल्ह्यात दोन साधू व एक ड्रायव्हर यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत १५४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली होती. त्यावेळी काही राजकीय पक्षांनी या घटनेला जातीय रंग देऊन वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र ही हत्या अफवा पसरल्यामुळे झाल्याचे सीआयडी तपासात समोर आले आहे. सीआयडीने या प्रकरणात ८०८ जणांना सखोल चौकशीसाठी  ताब्यात घेतले होते. त्यापैकी १५४ जणांना अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. एका व्हिडिओद्वारे गृहमंत्र्यांनी ही माहीती दिली आहे. पाहा काय म्हणालेत गृहमंत्री.