sharad pawar and supriya sule

मुख्यमंत्रीपदाबाबत सुप्रिया सुळे(supriya sule) यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. अशातच शरद पवार(sharad pawar) यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत आपले मत व्यक्त केले आहे.  सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी आशिष शेलार (ashish shelar)यांनी मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar) यांच्यासमोर केलं. होत. त्यानंतर सुप्रिया सुळे(supriya sule) यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत आपले मत व्यक्त केले आहे.  सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणास रस नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार यांनी म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे.ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांचा संच मोठा आहे. या सर्वांतून मान्य असतील अशा अनेक लोकांची नावं घेता येतील. अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे असे अनेकजण नेतृत्व करण्यात आघाडीवर आहेत.

पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव उपस्थित होते. शेलारांनी या कार्यक्रमावेळी म्हटले होते की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तींचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही.