शेलार – मीठपाडा येथे आंबेडकर नगर नामफलकाचे अनावरण 

भिवंडी: तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मिठपाडा(mithpada) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नामफलकाचे उद्घाटन(inaugaration स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांची मागणी होती की या भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. यासाठी स्थानिक युवकांकडून शेलार ग्रामपंचायतीकडे मागील वर्षीही मागणी करण्यात आली होती. या ठिकाणी स्वागत कमानही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असावी, अशी मागणी होती. मात्र यश मिळत नव्हते.

युवा वर्गाने पुढाकार घेऊन मीठपाडा या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर फलकाचे उद्घाटन केले. लवकरच स्थानिकांकडून या भागात स्वागत कमानदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येणार असल्याचे स्थानिक आंबेडकरी युवा कार्यकर्ता मोनिश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी स्थानिक युवक दिनेश जाधव,दशरथ जाधव,मुकेश,जाधव,निखिल उबाळे,शैलेश वाघमारे,अमोल भोईर,आकाश साळुंखे,गणेश जाधव,प्रदीप गायकवाड, रुपेश जाधव,गुरुनाथ बावडेकर, निमेश शेलार आदींनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे.