प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुरबाड माळशेज महामार्गावर खरब्याची वाडी येथे शिवभोजन केंद्र उभारण्यात आले होते. हे ठिकाण मुरबाडपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील गरजुंची गैरसोय होत होती. हे केंद्र हलवून ते मुरबाड बाजारपेठेत उभारावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती.

मुरबाड: मुरबाड शहरातील नागरिकांची सोय लक्षात घेऊन आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

मुरबाड, मुरबाड परिसर आणि चालत जाणारे स्थलांतरित मजूर यांची सोय लक्षात घेऊन मुरबाड माळशेज महामार्गावर खरब्याची वाडी येथे शिवभोजन केंद्र उभारण्यात आले होते. हे ठिकाण मुरबाडपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील गरजुंची गैरसोय होत होती. हे केंद्र हलवून ते मुरबाड बाजारपेठेत उभारावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यानुसार शुक्रवारी मुरबाड नगरपंचायतीच्या गाळ्यामध्ये या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ, नगराध्यक्षा छाया चौधरी, जयवंत सूर्यराव, मनोज देसले, अॅड सचिन चौधरी आदी उपस्थित होते. आतापर्यंत या केंद्रात वीस हजार गरीब गरजूंनी लाभ घेतला आहे.