आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, शिवेंद्रराजेंचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला(maratha reservation) अंतरिम स्थगिती दिली. राज्य सरकारने या प्रश्नावर लवकर तोडगा काढला पाहिजे .  नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असे शिवेंद्रराजेंनी(shivendraraje bhosale) म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला(maratha reservation) अंतरिम स्थगिती दिली. राज्य सरकारने या प्रश्नावर लवकर तोडगा काढला पाहिजे .  नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असे शिवेंद्रराजेंनी(shivendraraje bhosale) म्हटलं आहे. आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे, या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घेणं गरजेचं आहे असेशिवेंद्रराजे म्हणाले.  राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते . मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

इतिहासात मराठ्यांचं पानिपत झालं असं म्हटलं जातं. आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल आणि इतिहास पुन्हा तुम्हाला माफ करणार नाही, असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. तसेच आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनीही लक्ष घालावं असंही ते म्हणाले.