सामना संपादकीयमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता?

काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील, पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे असं मतही शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. पण आता काँग्रेसवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून थेट टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या कामात सातत्य नाही अशी थेट टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे. एवढेच नाही तर सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींवर यामधून थेट भाष्य करण्यात आले आहे.

    काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल असं म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील, पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे असं मतही शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

    काँग्रेस पक्षात सध्या काही उलढाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यातून सकारात्मक संदेश जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांच्या फेऱ्या सोनियांच्या निवासस्थानी वाढल्या आहेत. कमलनाथ हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होतील, अशी वावटळ त्यामुळे उठली आहे. खरे काय ते राहुल गांधींनाच माहीत. पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश अध्यक्षपदी नेमणूक करून पक्ष संघटनेत आता इतर कोणाची दादागिरी चालणार नाही हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर व नवज्योत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू होता. सिद्धू हे काँग्रेस सोडतील अशी हवा होती, पण गांधींनी वेळीच हस्तक्षेप केला.

    “सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. संघाचे लोक भाजपमध्ये असूनही प. बंगालात भाजपचा पराभव झाला. या पराभवामागे संघाचे वेगळे गणित असू शकेल, पण भाजपपेक्षा दारुण पराभव काँग्रेसचाही झाला. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश हे मोठे प्रदेश कधीकाळी काँग्रेसचे गड होतेच. आज तेथे काँग्रेससाठी परिस्थिती कठीण आहे,” असं शिवसेनेने स्पष्ट सांगितलं आहे.

    दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील आघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा ताजी असतानाच आता आघाडी सरकारमध्ये आणखी एक मिठाचा खडा पडला आहे.