राजकारण मध्ये न आणता सगळ्यांनी एकत्र काम केलं तरच देश वाचेल – संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सांगितले की,सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं.

    कोरोनामुळे देशात(Corona In India) भयानक स्थिती दिसत आहे. आरोग्य सेवांवरील ताण प्रचंड वाढला आहे. बेड, ऑक्सिजन, औषधाअभावी रुग्णांना तडफडून प्राण सोडावे लागत आहे. देशातील या परिस्थितीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेत केंद्र सरकारला फटकारलं आहे. या विषयावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली आहे.

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले की,सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं.

    ते पुढे म्हणाले की, “आज अनेक राज्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. महाराष्ट्र संघर्ष करतोय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आखल्या आहेत. महाराष्ट्राला सुद्धा ज्याप्रमाणात लसींचा पुरवठा व्हायला पाहिजे. तो होत नाही. गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद आहेत. राजेश टोपेंचं निवेदन ऐका. वेदना कळेल. सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे, पण फटकारून काय करणार?”

    संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. महाराष्ट्राला लढण्याची, संकटाचा मुकाबला करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू लढाई सुरू केली आहे. यातून नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो.”

    “राष्ट्रीय आपत्ती आहे. केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल वा त्यांचंही नियंत्रण सुटलं आहे. तर हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती नियुक्त केली पाहिजे.  समिती काम करेल म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. केंद्राकडून याचं नियंत्रण होणं गरजेचं आहे. राजकारणविरहीत काम केलं, तरच हा देश वाचेल नाही तर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं,” असेही राऊत यांनी सांगितले.