जे एस डब्ल्यूला प्रदूषण महामंडळाची कारणे दाखवा नोटीस

पेण: महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून जे एस डब्ल्यू स्टील‌ डॉल्बी या कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. जे एस डब्ल्यू स्टील डोलवी कंपनीमध्ये वारंवार प्रदूषण महामंडळाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीच्या को प्लांटमधून २९ जुलै अचानक काळे, निळे,लाल,पिवळे धुराचे लोट बाहेर येऊन पेणमध्ये भोपाळसारखी परिस्थती तर नाही ना अशी शंका तालुक्यातील लोकांना वाटू लागली होती. परिसरातील सुमारे पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत एक उग्र वास येत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे एकच वातावरण पसरले होते.

याबाबत कंपनी प्रशासनाकडून सारवासारवीची उत्तरे देण्यात आली. मात्र तांत्रिकदृष्ट्या न पटण्यासारखी उत्तरे होती आणि प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास झाला याबाबतीचा सारासार विचार करून महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडून कंपनीला ३० जुलैला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

यामध्ये प्रदूषण बोर्डाकडून दिलेली सहमती का रद्द केली जाऊ नये? आपल्या युनिटचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यास सक्षम प्राधिकरण आला निर्देशित का केले जाऊ नये ?  आपल्या युनिटचे उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश का दिले जाऊ नये ? अशा प्रकारची महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून विचारणा केली असून इतिहासात दिवसाच्या आत या कारणे दाखवा नोटीस चे उत्तर दिले नाही तर कंपनीवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशा प्रकारची नोटीस जे एस साळुंखे महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड रायगडचे प्रमुख यांनी दिलेली आहे.

याबाबत जे एस डब्ल्यू स्टील कंपनीकडे विचारणा करण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता जनसंपर्क अधिकारी बेटकेकर यांचा मोबाईल बंद होता.

 या सर्व घटनेचा पाठपुरावा सह्याद्री प्रतिष्ठान पेण व समजसेविका समिता राजेंद्र पाटील यांनी केला असून महाराष्ट्र उपाध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान व माजी नगरसेवक समीर म्हात्रे यांनी असे सांगितले की, यापुढे कंपनीच्या विरोधात अधिक तीव्र संघर्ष करून जे एस डब्ल्यू कंपनीला प्रदूषणावर नियंत्रण आणण्यास भाग पाडू.