कल्याणमधील कचोरे येथे श्रीराम चौकाचे लोकार्पण

कल्याण : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी व साधूसंताच्या उपस्थितीत पार पडल्यानंतर कल्याणमधील कचोरे प्रभागात नगरसेविका रेखा चौधरी यांच्या हस्ते कल्याण जिल्हा बजरंग दलाचे संयोजक राजन चौधरी व कार्यकर्ते नागरिकांच्या उपस्थितीत मोहन सृष्टी येथे श्रीराम चौक फलकाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर नगरसेविका रेखा चौधरी यांनी प्रभागात मिठाई वाटली. राम रक्षा स्तोत्र व सुंदरकांड यांचे पठण यावेळी करण्यात आले. प्रभागातील नागरिकांनी घराबाहेर रांगोळ्या काढल्या.  ध्वज पताका, दिवे लावण्यात आले होते.