“काय माहित रात्री कुणाला अटक झाली तर..” भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे नेते आहेत. यात अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू असून एकनाथ खडसे यांची जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. तर, प्रताप सरनाईक यांची देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. या नेत्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे.

  “काय माहित रात्रीतुन कुणाला अटक झाली तर..” असं वक्तव्य नाशिक दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पण, हा एक सूचक इशारा तर नाही ना? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

  हे नेते आहेत तपास यंत्रणांच्या रडारवर

  सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे नेते आहेत.

  यात अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू असून एकनाथ खडसे यांची जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. तर, प्रताप सरनाईक यांची देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. या नेत्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे.

  नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

  “उद्या काही पर्सनल भेटी आहेत. काही ना काही रोजच घडत असतं. काय माहित की रात्रीच कुणाला अटक होईल आणि तुम्हाला माझी प्रतिक्रिया द्यावी लागेल.”

  दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीने जप्त केल्याने चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व आहे. त्यामुळे यांच्या विधानाप्रमाणे रात्री कुणाला अटक होते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.