राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली ; १३ सप्टेंबरऐवजी २० सप्टेंबरला होणार परीक्षा

मुंबई : कोरोना महामारीमुळे आधीच विलंबित झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही  परीक्षा आता १३ सप्टेंबर ऐवजी २० सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.१३ सप्टेंबरला  देशभरात NEET परीक्षा  होत असल्याने दोन्ही परीक्षांसाठी केंद्रांची उपलब्धता नसल्याने महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता २० सप्टेंबर रोजी होईल.

दरम्यान ,  आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार २३ डिसेंबरला राज्यसेवेची पूर्व परीक्षा ५ एप्रिल२०२० रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आयोगाने १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार परीक्षा १३  सप्टेंबरला घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) असल्याने आयोगाने आता ही परीक्षा २० सप्टेंबरला घेण्याचे ठरविले आहे.