शहरातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन कारवाई करणार -जगताप

महाड:  तारिक गार्डन इमारतीच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही , या घटनेच्या पार्शभूमूवर महाड शहरातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ॲाडीट करुन अशा इमारतींवर आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आज दिला आहे. याच परिसरातील अलकासिम काॅम्पलेक्स या इमारतीतील रहिवाशांनी इमारतीला धोका असल्याची तक्रार नगर परिषदेकडून दिल्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्यात आले. ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर अलकासिम इमारतीतील रहिवाशांचा धोका टाळण्यासाठी ही इमारत रहिवासमुक्त करण्याची नोटीस संबंधित इमारतीच्या रहिवाशांना ११ ॲागस्ट २०२० रोजी नगर परिषदेने बजावली असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी दिली.