ajit pawar and sudhir mungantiwar

भाजपाचे(bjp) अनेक आमदार संंपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे(rashtrawadi congress) नेते आहेत. त्यावर तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे(bjp) अनेक आमदार संंपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे(rashtrawadi congress) नेते आहेत. या मुद्द्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार(sudhir mungantiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना आव्हान दिलं आहे.

भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. याबाबत मुनगंटीवार यांनी असं म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणतायंत की भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात जर ताकद असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणं तुम्हाला जमायचं नाही, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भाजपाचे २० आमदार आमच्या पक्षात येणार असं काही जण सांगत आहेत. २० तर सोडाच, पण १२ महिन्यात १२ आमदारही तुम्हाला फोडता आले नाहीत. आम्ही लिहून देतो की आमचे जे आमदार तुमच्या पक्षात यायला तयार असतील, त्या आमदारांची आणि तुमची मिटींग आम्हीच घडवून देतो. तुम्हाला तुमच्या बळावर खूप विश्वास असला तरी आम्हाला आमच्या विचारांवर आणि निष्ठेवर पूर्ण विश्वास आहे.