कोरोनामुळे १० हजार ८२१ मुले ठरली शाळाबाह्य, सर्वेक्षणातून मोठा खुलासा

कोरोनामुळे(corona) मुंबईतील(mumbai) तब्बल १० हजार ८२१ मुले शाळाबाह्य(children dropped from school) ठरली आहेत. यामध्ये मुलांची संख्या ५६४६ तर मुलींची संख्या ५१७४ इतकी आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आणि मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून(survey report) ही आकडेवारी उघडकीस आली आहे.

    मुंबई: कोरोनामुळे(corona) शिक्षण क्षेत्राची(education field) अवस्था फारच बिकट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला असून, कोरोनामुळे मुंबईतील तब्बल १० हजार ८२१ मुले शाळाबाह्य ठरली आहेत. यामध्ये मुलांची संख्या ५६४६ तर मुलींची संख्या ५१७४ इतकी आहे.

    शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आणि मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी उघडकीस आली आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. परिणामी, अनेकजण गावाला स्थलांतरित झाले. अनेक मुले शाळांपासून दूर झाले. अनेक मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, असे जाहीर केले होते.