सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : सीबीआय पथक मुंबईत दाखल

सर्वोच्च न्यायालयाने काल  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास  सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला होता.त्या पार्श्वभूमीवर  आज  सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.सीबीआय पथक सुशांतसिंह राजपूत प्रकरणासंबधित कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

१४ जून रोजी वांद्रे येथील  ज्या घरात सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्या घरात सीबीआयची टीम पुन्हा चौकशी करण्यासाठी जाऊ शकते. १४ जूनला  वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तब्बल ५६ जणांचे जबाब नोंदवले होते. सीबीआय टीम वांद्रे पोलिसांकडून घटनास्थळाच्या पंचनाम्यापासून संभाव्य साक्षीदारांच्या जबाबांपर्यंत सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्याची शक्यता आहे.