महाडमधील ‘त्या’ देवदूताला कोरोनाची लागण

महाड: महाडमधील तारिक गार्डन(tariqur garden) इमारत दुर्घटनेनंतर स्वप्नील शिर्के या तरुणाने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पंधरा जणांना बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले. यात तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर महाड येथील डॉ. रानडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांची चाचणी करावी लागणार आहे.

दरम्यान, या शोध मोहिमेत ज्या शासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या त्या यंत्रणेतील सर्व व्यक्तिंची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी(nidhi choudhary) यांनी घेतला आहे. तर बचाव कार्यात सहभागी झालेल्या संस्था आणि नागरिकांची कोरोना चाचणी लोक विकास सामाजिक संस्था करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी दिली.