maharashtra corona cases

राज्यात ४४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. या ४४८ मृत्यूमध्ये पूर्वीचे ४७ मृत्यू अशा एकूण ४९५ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ४९५ मृत्यूंपैकी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

मुंबई : गुरुवारी राज्यात २३,४४६ नवीन रुग्णांचे निदान झाले (maharashtra coronavirus cases ) असून कोरोना बाधितांची एकूण संख्या ९,९०,७९५ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,६१,४३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज १४,२५३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७,००,७१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७२ % एवढे असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान राज्यात ४४८ करोना (coronavirus) बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. या ४४८ मृत्यूमध्ये पूर्वीचे ४७ मृत्यू अशा एकूण ४९५ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ४९५ मृत्यूंपैकी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३३ मृत्यू सातारा -२५, जळगाव -२०, नाशिक -१६, पुणे -१२, ठाणे -११, अहमदनगर -१०, नागपूर – ९,कोल्हापूर – ७, औरंगाबाद – ७,जालना -४,धुळे -४, पालघर -२, सांगली -२, मुंबई -१, नंदूरबार -१, रायगड -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८५ % एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४९,७४,५५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,९०,७९५ (१९.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १६,३०,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,२२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.