devendra fadanvis

मी ब्राह्मण(i am brahmin) असल्याने माझ्या माथी काहीही मारलं तरी चालतं, असा काही लोकांचा समज आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी म्हटले आहे. मात्र मराठा समाज(maratha community) तसेच राज्यातील सगळ्या लोकांसाठी मी काय केले , हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे चुकीचे समज पसरविणारे कधीच यशस्वी होणार नाहीत, असे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ज्यावेळी तुम्ही लोकांना समजावू शकत नाही त्यावेळी गोंधळात टाकण्याचा सिद्धांत वापरला जातो. हाच सिद्धांत वापरून आधीच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. काही लोकांना असे वाटते की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी काहीही मारले तरी चालते, असे समजून काहीजण चुकीचे प्रयत्न करत आहेत. मात्र मराठा समाज तसेच राज्यातील सगळ्या लोकांच्या हितासाठी मी काय केले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरविणारे कधीच यशस्वी होणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्यामध्ये कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये. ते दोघे मिळून मराठा समाजाचे नेतृत्व करतील. त्यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करु नये.

पोलीस भरतीबाबत फडणवीस म्हणाले की, भरती करावी लागणार आहे हे मान्य आहे. मात्र त्याची घाई करू नये. मराठा आरक्षणाबाबत पुढे काय निर्णय होतो हे पाहण्यासाठी थांबा. एक महिना उशिरा भरती झाली तरी काही नुकसान होणार नाही. राज्यात कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामांचाही विचार करायला पाहीजे. सरकारने मराठा समाजाचा भरतीसाठी विचार करायला हवा.