कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयात असा साजरा झाला रक्षाबंधनाचा सण

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सण साजरा करता नाही आले पण सामाजिक बांधिलकी जपत शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुहासिनी बेडेकर आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हा सण साजरा केला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना राखी बांधून त्यांच्या स्वास्थ व सुखी होण्याची प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी रुग्णांना राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि वेगळे समाधान दिसले. आज कोरोनावर मात करणारे अनेक रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील एका रुग्णाने खंत व्यक्त करीत सांगितले की, आमच्या बहिणी दवाखान्यात येऊ शकल्या नाहीत. मात्र आज रुग्णालय कर्मचाऱ्यांनी राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पार पाडले आहे. तुमचे हे उपकार जीवनात विसरण्यासारखे नाही. या प्रसंगी शास्त्रीनगर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुहासिनीं बेडेकर, मेट्रन मंगल सोनावणे, परिचारिका घनवाड मानकर,एम फाटक,देशमुख आदी परिचरिकांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

डॉ सुहासिनीं बेडेकर यांनी या प्रसंगी रुग्णांची योग्य दखल घेतली जाते आणि औषधोपचार चांगल्या प्रकारे करण्यात येत असल्याचे सांगितले. मेट्रन मंगल सोनावणे यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग कमी होत आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांची चांगली सोय  आणि देखरेख होत असून वेळोवेळी औषध आणि जेवणाची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची योग्य काळजी घेतली जाते.