facebook

एकाच घरातील तीन सख्ख्या बहिणींची फेसबुकवर (Facebook) एका मुलाशी मैत्री झाली. तिघींच्याही(three sisters ran away from home) मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्या तिघीही एकाच दिवशी आपआपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची अजब घटना उघडकीस आली आहे.

    पाटणा : ऑनलाईन(online) ओळख होणं आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात(love story) होण हे काही नवीन नाही. मात्र पाटण्यामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एकाच घरातील तीन सख्ख्या बहिणींची फेसबुकवर (Facebook) एका मुलाशी मैत्री झाली. तिघींच्याही(three sisters ran away from home) मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्या तिघीही एकाच दिवशी आपआपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची अजब घटना उघडकीस आली आहे.

    हे सर्व प्रकरण बिहार (Bihar) मधील बक्सर आणि भोजपूर या गावातलं आहे. या तिन्ही बहिणी बक्सरच्या आहेत. तर मुलं ही भोजपूरची आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine day) दिवशी या तिन्ही बहिणी गावातील आणखी एका मुलीसोबत पळून गेल्या. गावातील चार मुली एकाच वेळी गायब झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी बक्सरच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.

    हे तरुण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गाडी घेऊन मुलींच्या गावात आले होते. त्यानंतर ते मुलींना घेऊन पाटणा आणि आरामध्ये गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या तिन्ही मुली पटणामध्ये आहेत, असं कळलं.तसंच या मुलींसोबत मुलं असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीची खात्री होताच पोलिसांनी पाटणामध्ये एका जोडप्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी अन्य जोडपी आरा या गावात असल्याचं समजलं. पोलिसांनी त्या गावातून त्यांनाही ताब्यात घेतलं. या सर्व मुलांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.