कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या संख्येने ४०० चा टप्पा पार केला आहे. आज ३३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २१,३९८  झाली आहे. यामध्ये ४९८७ रुग्ण उपचार घेत असून १६,००७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४०४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३३७  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -६२,  कल्याण प.-८५,  डोंबिवली पूर्व -८१,  डोंबिवली प-७४,  मांडा टिटवाळा १४,  मोहना १८, तर पिसवली येथील ३  रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  २० रुग्ण ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ५ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, तर ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.