marriage

भरतपूर जिल्ह्यातील करौली गावामध्ये नरेंद्र सिंह यांच्या मुलाचे छतरपूर गावातल्या एका मुलीशी लग्न झाले. आपल्याला हेलिकॉप्टरमधून निरोप मिळावा,(marriage farewell in helicopter )अशी नवरीची इच्छा होती. ती इच्छा तिच्या सासऱ्यांना समजताच त्यांनी त्यावर लगेच त्याची अंमलबजावणी केली.

भरतपूर : आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न थाटात व्हावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी जाऊन लग्न करणे किंवा वेगळी सजावट करुन लग्न करणे असल्या गोष्टींवर खूप खर्च केला जातो. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातल्या एका नवरीला एका वेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला. या अनोख्या बिदाईची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

भरतपूर जिल्ह्यातील करौली गावामध्ये नरेंद्र सिंह यांच्या मुलाचे छतरपूर गावातल्या एका मुलीशी लग्न झाले. आपल्याला हेलिकॉप्टरमधून निरोप मिळावा,(marriage farewell in helicopter )अशी नवरीची इच्छा होती. ती इच्छा तिच्या सासऱ्यांना समजताच त्यांनी त्यावर लगेच त्याची अंमलबजावणी केली.

मुलीच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरु असताना अचानक गावात हेलिकॉप्टर दाखल झालं. त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. आपल्या पाठवणीच्या कार्यक्रमासाठी सासऱ्यांनी हेलिकॉप्टर मागवले आहे, हे पाहून त्या सुनेला आश्चर्याचा धक्का बसला.  सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्यासह सासरी जाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण घेतले.

नव्या जोडप्यासह हेलिकॉप्टर मुलाच्या गावी जमले तेव्हा तिथल्या लोकांनीही हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली. या दाम्पत्याला दोन्ही गावातील प्रवास हेलिकॉप्टरने पूर्ण करण्यासाठी ५ लाख रुपये खर्च आला.