राज्यात आज १४,४९२ नवे रुग्ण, ३२६  रुग्णांचा  मृत्यू

मुंबई : राज्यात १४,४९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,४३,२८९ झाली आहे. राज्यात १,६२,४९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २१३५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३२ % एवढा आहे. 

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा २, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल २, नाशिक ७, अहमदनगर १७, जळगाव २०, पुणे ५९ पिंपरी चिंचवड मनपा ३६, सोलापूर ३, कोल्हापूर २२, सांगली १५, नागपूर २१ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे १४, कोल्हापुर ८, ठाणे ४, औरंगाबाद २, जळगाव २ , नाशिक १ आणि सांगली १ असे आहेत. आज १२,२४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,५९,१२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४,१४,८०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,४३,२८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत