वसई विरार पालिका हद्दीतील मालमत्तांच्या डिजिटल सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण शिबीर

वसई: वसई विरार(vasai virar) शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचे(property) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने सर्वेक्षण(survey) करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या डिजिटल सर्वेक्षण प्रशिक्षण शिबिरास सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक ,पर्यवेक्षक व ठेका कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

महानगरपालिकांच्या क्षेत्रात नव्याने मालमत्तांचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय  आयुक्तांनी ३१ ऑगस्ट रोजी घेतला. हे सर्वेक्षण डिजिटल असल्यामुळे ते व्यवस्थित रित्या करता यावे म्हणून ३ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभागृह, मुख्यालय ,चौथा मजला येथे हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शारीरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशिक्षणाचे वेळापत्रक करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा वेळ खाली दिल्याप्रमाणे असेल.

प्रभाग समिती ए व सी सकाळी ११ ते १२, प्रभाग समिती बी व ई दुपारी १२ ते १ ,प्रभाग समिती ती एफ व जी दुपारी २:३० ते ३:३० व प्रभाग समिती आय सायंकाळी ४:३० ते ५:३० सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार न चुकता उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.