तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

मुंबई : दबंग अधिकारी असलेले तुकाराम मुंढेंची (IAS Tukaram Mundhe ) अखेर नागपूर महापालिका (Nagpur Muncipal Corporation)आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे.तुकाराम मुंढेंच्या कामकाजावर नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने तसंच काँग्रेसनेही सातत्याने नाराजी दर्शवली होती. त्यांची बदली मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढें यांना कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंढे यांनी कसोशीनं प्रयत्न केले होते. त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली. त्यानंतर लगेच दोन दिवसांत त्यांची बदली सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे करण्यात आली आहे.