accident

भिवंडी: ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून दुचाकीस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात(accident) दुचाकीस्वार(two wheeler driver) गंभीर जखमी(injured) झाल्याची घटना हायवे दिवे पेट्रोल पंपासमोर घडली आहे. या अपघाताप्रकरणी ट्रकचालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाचा साथीदार रामलालजी गुजर याने दुचाकीस्वार तिरुपती दासरी यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे तर ट्रक चालक धर्मेंद्र सिंग फरार झाला आहे. या घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दिलीप शिंदे करीत आहे.