rape

रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अतिप्रसंगाचे प्रमाण वारंवार घडत असल्यामुळे पालक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून नंतर तिची आत्महत्या करण्यात आली.

सुतारवाडी : रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अतिप्रसंगाचे प्रमाण वारंवार  घडत असल्यामुळे पालक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून नंतर तिची आत्महत्या करण्यात आली. ही गोष्ट ताजी असतानाच १९ जुलै २०२० रोहा तालुक्यातील मोठी खरबाचीवाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या नराधमांच्या मुसक्या पोलिसांनी तत्परतेने आवळल्या. 

कोलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहणार मोठी खरबाची वाडी (चिंचवली तर्फे आतोणे ) वय वर्ष १५ ही दिनांक १९ जुलै २०२० रोजी मैत्रिणीसोबत किराणा सामान आणण्यासाठी दिघेवाडी येथे गेली असता सामान घेऊन परतत असताना आरोपी क्र. १ राहणार वडाची वाडी चिंचवली तर्फे आतोणे याने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या हातून छत्री हिसकावून फिर्यादीला हाताला धरून तिला आंब्याच्या झाडा जवळ जंगलात नेले. तिच्यावर अतिप्रसंग करणार तेवढ्यात आरोपीचा मोठा मोबाईल खणखणला यावेळी फिर्यादी मुलीने प्रसंग साधून आरोपीला धक्का दिला आणि सुटका केली. तर आरोपी क्र.२ राहणार मोठी खरबाची वाडी याने फिर्यादीची मैत्रीण जोरात ओरडत असल्यामुळे तिला पकडण्यासाठी जोरात पाठलाग केला. तिच्याजवळ जाऊन तिच्यावर बळजबरी केली. फिर्यादी मुलींवर बळजबरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने पीडित मुलीने केलेल्या तक्रारीवरून कोलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. प्रशांत तायडे करत आहेत. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून नराधमांना काहीच भीती वाटत नसल्यामुळे अशा प्रसंगांची पुनरावृत्ती घडत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मुलींना घराबाहेर पाठवायचे की नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.