उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली राज्यमंत्री बच्चू कडू यांची गाडी, पाहा व्हिडिओ

राज्यमंत्री बच्चू कडू हे भरतपूरवरून मथुरेला जात होते. यावेळी राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर बच्चू कडू आणि त्यांच्या साथीदारांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले.

सरकारकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना अडवण्याचा, दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. याची आज पुन्हा एकदा प्रचिती आली आहे, राज्यमंत्री बच्चू कडू हे भरतपूरवरून मथुरेला जात होते. यावेळी राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर(uttar pradesh border) बच्चू कडू(bacchu kadu) आणि त्यांच्या साथीदारांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. तसेच पुढे न जाण्याबद्दल आवाहन केले.