महाराष्ट्रात लसींची तीव्र टंचाई – गरज ८ लाखांची, मिळतात २५ हजार – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कबुली

लसीकरण मोहिमेतील अडथळे(problems in vaccination) काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(rajesh tope) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

  मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुभारंभ केलेल्या मोफत लसीकरण मोहिमेतील अडथळे(problems in vaccination) काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(rajesh tope) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

   १८ ते ४४ वयोगटासाठी सध्या लस उपलब्ध नाही
  आरोग्य मंत्री म्हणाले की, लस हा एक महत्त्वाचा विषय आहे. ४५ वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त ३० हजार व्हॅक्सीन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात ९ लाख डोसेस आले आहेत. त्यामुळे ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी हे डोस द्यायचे आहेच. राज्यात सर्व ठिकाणी ते वितरित केले जातील. १ कोटी ६५ लाख नागरिकांना आपण लस दिलेली आहे. हे सर्व नागरिक ४५ वर्षापेक्षा जास्त आहेत. मात्र १८ ते ४४ वयोगटासाठी अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  १८ ते ४४ वयातील १ लाख लोकांचे झाले लसीकरण
  टोपे म्हणाले की, देशात चार पाच राज्यांमध्ये १ मे रोजी लसीकरण सुरु झाले. त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे. लसीकरणाच्या मोहिमेला आम्ही प्राधान्य दिले आहे. एक मेच्या आधी फक्त ३ लाख लसी मिळाल्या. या सर्व लसी घेऊन १तारखेलाच लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. १८ ते ४४ वयातील लोकांना आपण आतापर्यंत १ लाख लोकांना लस दिली आहे. कोव्हीशील्ड लसीला १३  लाख ८० हजार डोसेच्या खरेदीची मागणी केली आहे. तर कोव्हॅक्सीन लसीसाठी ४लाख ७९ डोसची ऑर्डर दिली आहे.  असे साधारण मिळून १८ ते साडे अठरा लसींची ऑर्डर दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये
  टोपे म्हणाले की, महाराष्ट्रातील तरुणाईला विनंती आहे की नोंदणी किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरणावर गर्दी करु नये. जागतिक निविदामधून अनेक देशांनी प्रतिसाद दिला आहे. ज्या देशांकडून आपल्याला ऑक्सिजन लवकर मिळेल त्यांच्याकडून तो लवकर खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लिक्विड ऑक्सिजनसाठीसुद्धा काही ऑफर्स आल्या आहेत. त्याविषयी जसे निर्णय होतील ते कळवत राहू असे टोपे म्हणाले.

  राजेश टोपे म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री  तसेच सर्व मंत्र्यांचे मत हे एका चेकमध्ये लसी खरेदी करुया असे आहे. मात्र, सध्या लसी उपलब्ध होत नाही. सध्या स्पुटनिक लससुद्धा आली आहे. त्याविषयी दर ठरवणे बाकी आहे. त्यानंतर ही लससुद्धा मिळेल. पुण्याचे अदर पूनावाला यांच्याशीसुद्धा चर्चा सुरु आहे. ते विदेशातून परत आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करु.