बलात्कार प्रकरणी माजी IPS अधिकाऱ्याच्या अटकेचा व्हिडिओ व्हायरल; अटक बेकायदेशीररीत्या केल्याचा आरोप

मुख्तार अन्सारी यांच्या सांगण्यावरून बलात्काराच्या एका प्रकरणात आरोपी खासदार अतुल राय यांना वाचवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप .....

    लखनऊ (Lucknow) : उत्तर प्रदेशातील माजी आयपीएस अधिकारी (Former Uttar Pradesh IPS officer) अमिताभ ठाकूर (Amitabh Thakur) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केलीय (arrested by the police).

    यावेळी, ठाकूर यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार देत त्यांच्या तावडीतून सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय.

    बलात्कार आरोपी खासदाराला मदत केल्याचा आरोप (Accused of helping MP accused of rape)
    अमिताभ ठाकूर यांच्यावर बलात्काराच्या एका प्रकरणात आरोपी खासदाराची मदत केल्याचा आरोप आहे. अमिताभ ठाकूर यांनी उत्तर प्रदेशचे बाहुबली नेते मुख्तार अन्सारी यांच्या सांगण्यावरून बलात्काराच्या एका प्रकरणात आरोपी खासदार अतुल राय यांना वाचवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ठाकूर यांच्याकडून मात्र पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचा आरोप केलाय.