अंतिम सत्राची परीक्षा असाईनमेंट स्वरुपात घेण्याची विद्यार्थी भारतीची मागणी

कल्याण : अंतिम परीक्षा(last semester exam) घेतली जाणार असेल तर विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा केंद्रावर न बोलवता व्हॉट्स अॅप व ईमेलच्या माध्यमातून असाईनमेंट(assignment) स्वरूपात परीक्षा घेतल्या जाव्यात व परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणतेही बदल करू नये, अशी मागणी विद्यार्थी भारती(vidyarthi bharti) राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली आहे.

असाईनमेंट सबमिट करण्यासाठी ग्रामीण पातळीवर कॉम्प्युटर व इंटरनेटच्या सोयी ग्रामपंचायतीमध्ये पुरवण्यात याव्या त्यासाठी मुख्य केंद्रावर विद्यार्थ्यांना बोलावण्याची सक्ती करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणतेही प्रयोग करु नये, असे विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितले.

परिक्षा ऑफलाईन ऑनलाईन घेतलीच जाऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका घेऊन परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढावा. जरी परीक्षा घ्यायचीच असेल तर व्हाट्सएपच्या व ईमेलच्या माध्यमातून असाईनमेंट देऊन विद्यार्थ्यांनची परीक्षा घ्यावी. एक ही विद्यार्थी परीक्षेपासून मुकला नाही पाहिजे, ह्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य नसेल त्यांना मुदत देण्यात यावी. एकाही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याची जबाबदारी शासनाने घ्यावी.

या काळात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर त्याला शासन जबाबदार असेल त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई १ कोटी द्यावी. अंध अपंग विद्यार्थ्यांना योगय सोयीसुविधा पुरवण्याची जबबदारी शासनाची, विद्यार्थ्यांना अडचण निर्माण करू नये. असाईटमेंट सबमिट करण्यासाठी ग्रामीण पातळीवर कॉम्प्युटर व इंटरनेटची सोयी पुरवण्यात याव्यात आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.