राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा १० दिवसांमध्ये होणार नीट, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा

राज्यात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा (remdesivir injection and oxygen supply) पुढील १० दिवसांमध्ये नीट केला जाईल, असं विजय वडेट्टीवार(vijay wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठा तुटवडा(Oxygen and Remdesivir Injection shortage) भासत आहे. अशातच राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुढील १० दिवसांमध्ये नीट केला जाईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

    रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलं आहे. त्याला काही कंपन्यांनी पुरवठा दिला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचा पुरवठा योग्य केला जाईल, असंही वडेट्टवारांनी म्हटलं आहे.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. अशावेळी केंद्रानं लॉकडाऊन लावला तर देर आये दुरुस्त आहे. आम्ही आधी लावला तर त्याला विरोध करण्यात आला. आता त्यामुळेच रुग्णसंख्या कमी होत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

    कंगनाचं ट्विटर ब्लॉक केलं ते योग्यच केलं. कुणीही काहीही बोलावं हे योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ओळखावी. जेवढ्या मर्यादा असतील तेवढंच बोलावं. कोणत्या पक्षाची बाजू घेऊन बोलू नये, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी केला आहे.