भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाओ आंदोलन

भिवंडी: कोरोना काळात बंद केलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख बस वाहतूक तात्काळ सुरू करावी , लॉकडाऊन बंद करावे या मागणीसाठी राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते डफली वाजवून सरकारचा निषेध करीत आहेत. भिवंडी शहरात जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एस. टी. स्थानकात भर पावसात एकत्रित होत डफली वाजवून सरकारचा निषेध केला आहे.

जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बुद्धेश जाधव, बालाजी कांबळे, गुणवंत शिंदे, अंकुश बचुटे, बादल सय्यद ,प्रल्हाद गायकवाड, मीरा मते आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर बस आगार व्यवस्थापक एस पी डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना बस सेवा तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.